फुलंब्री तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा

फुलंब्री/प्रतिनिधी
शासनाकडून राज्यात आलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी केलेल्या असून त्यामध्ये फुलंब्री तालुक्याचा नाव नसल्याचे दिसून आले आहे.आपणास ज्ञातच आहे की नुकत्याच संपलेल्या पावसाच्या हंगामामध्ये फुलंब्री तालुक्याचा मोठा प्रमाणात पाऊस झालेला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्वांचे पिके जास्तीच्या पावसा मुळे हातातून निघुन गेलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शासनाची मदतीची अपेक्षा आहे. यामध्ये फुलंब्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या ओल्या दुष्काळाच्या यादीमध्ये फुलंब्री तालुक्याचे नाव असणे आवश्यक आहे. जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाचे मदतीचा फायदा होईल. फुलंब्री तालुक्यात झालेल्या पावसाचे परिणाम लक्षात घेऊन फुलंब्री तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा. याकरिता भारतीय जनता पार्टी फुलंब्री तालुक्याच्या वतीने फुलंब्री तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहासभाऊ_शिरसाट,माजी सभापती सर्जेराव मेटे, सरचिटणीस गोपाळ वाघ, राजू तुपे, योगेश मिसाळ, राम बनसोड, फारुक शेख, आबासाहेब फुके, अजय नागरे व भारतीय जनता पार्टी फुलंब्री तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.