शिक्षक समितीच्या प्रयत्नांना यश;शाळांच्या दिवाळी सुट्टीत बदल

औरंगाबाद / प्रतिनिधी
राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, विजयजी कोंबे(राज्य महा सचिव) सह सर्व कार्यकारिणी तसेच शिक्षक समितीचे सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार! दोन दिवसांपूर्वी दिवाळीची सुट्टी जाहीर होणार आहे, असे कानावर आले. आनंद झाला. पण कालच्या पत्रानुसार फक्त ५ दिवसच दिवाळीची सुट्टी! हे वाचून धक्काच बसला. शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रथम सत्राचे काम केले आहे. पाठ्यक्रम शिकवून पूर्ण केला आहे. आणि द्वितीय सत्रातील पाठ्यक्रम पुढील कालावधीत पूर्ण करणारच आहोत. मग सुट्टीबाबतीत असे का? असा प्रश्न मनात येऊ लागला. लगेच तसा मेसेज शिक्षक समितीच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून राज्याध्यक्षांपर्यंत पोहोचवला. आणि राज्याध्यक्षांनीही याची दखल घेऊन काल दि.५ नोव्हेंबर रोजी रात्री १:२० वा दिवाळी सुट्टी बाबत EMAIL द्वारे निवेदन शासनाला पाठवले. व आज मा. उदयजी शिंदे राज्याध्यक्ष शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य यांनी मंत्रीमहोदयांशी संपर्क साधून १४ दिवस दिवाळीची सुट्टी मंजूर करुन घेतली. जिथे आपल्या शिक्षकांवर अन्याय, पिळवणूक होईल ते प्रश्न प्रधान्याने मांडणे व सोडवणे, महत्वाचे आहे. तरच शिक्षकाचे स्वास्थ्य उत्तम राहील आणि विद्यार्थी घडवण्याचे, गुणवत्ता वाढवण्याचे कार्य साध्य होईल. आणि मार्च २०२० पासून ऑनलाईन शिक्षण,कोरोना ड्युटी, इतर प्रशासकीय कामे इ. कामातून १४ दिवस आपल्या शिक्षकांना विसावा मिळेल. हा विषय तात्काळ शासनासमोर मांडला.राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्टी बाबतच्या शासन परिपत्रकात सुधारणा करून नव्याने परिपत्रक निर्गत करून संभ्रम दूर करणेबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे मा.शालेय शिक्षण मंत्री, वर्षाताई गायकवाड मा.अति.मुख्य सचिव, मा.राज्य आयुक्त यांना कालच तसे पत्र व Email करून योग्य निर्णय घेण्याचे सुचित केले. शासनासमोर शिक्षकांच्या रास्त भावना मांडल्याबद्दल व शासनास दिवाळीच्या सुट्यात वाढ करण्यास व संभ्रम दूर केल्याबद्दल राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, विजयजी कोंबे(राज्य महासचिव) यांसह सर्व राज्य पदाधिकारी यांचे शिक्षक समिती परिवाराकडून आभार मानले जात असल्याचे औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, नितीन नवले, शाम राजपूत, शालिकराम खिस्ते, गुलाब चव्हाण,विष्णु भंडारे, के.के.जंगले, रऊफ पठाण, चंदू लोखंडे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी, औरंगाबाद तालुका अध्यक्ष कडुबा साळवे, भाऊसाहेब-बोर्डे, विलास चव्हाण, बबन चव्हाण, कैलास ढेपले, संजय शेळके, मंगला मदने, वर्षा देशमुख, वैशाली हिवर्डे,अर्जुन पिवळ, प्रकाश जायभाऐ, के.डी.मगर, दत्ता खाडे, पंकज सोनवणे, पंजाबराव देशमुख, आदिंनी आभार मानले.