आपघातग्रस्त रूग्णांची मदत करणाऱ्या गणेश राऊत यांचा सन्मान

गंगापुर / प्रतिनीधी
औरंगाबाद – नगर – पुणे हायवेवर राञंदिवस अपघाताची मालिका सुरूच आहे. राञी अपराञी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा अपघाताची घटना घडल्यास घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचण्या आधिच सामाजिक कार्याचा वसा जोपासनारे सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत हे आपल्या सहकारी मिञांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतात.रूग्णांना मदतकार्य करून तात्काळ पुढील उपचारासाठी घाटी रूग्णालयात हलविण्यासाठी सर्वोतपरी मदत करतात या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्था,पक्ष,संघटना यांनी त्यांना वेळोवेळी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्याचप्रमाने नुकतेच दहेगाव बंगला (ता.गंगापुर ) येथिल सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांनी अपघातग्रस्त रूग्णांना वेळेवर स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तेथेच त्यांनासाह्य करून व आत्ता पर्यंत एक हजार पेक्षा जास्त रुग्णांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून त्यांचे प्राण वाचविल्याबद्दल व सामाजिक कार्यात अतुलनीय कार्य केल्या बद्दल राऊत यांना दहेगाव रत्न हा पुरस्कार देऊन ग्रूप ग्रामपंचायत दहेगाव बंगला मुरमी सारंगपुर यांनी सन्मानित करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशासक सि.एस.खोचे, ग्रामसेवक के.एस.आरू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.