युवकाचा अपहरण करुन केला गोळीबार, गाडीचा डिझेल संपल्याने जीव वाचला

औरंगाबाद / प्रतिनिधी
शहरातील हुसैन कॉलनी येथील रहीवाशी हाफीज नदीम रऊफ पठाण, वय 34 या युवकाचे 11:30 वाजेदरम्यान PWD कॉलनी, शाहनूरमिया दर्गाह उड्डाणपूलाजवळ साईडवर काम सुरु असताना तीन चार अज्ञात इसमांनी बळजबरीने अपहरण करुन इंडिगो गाडी क्रं. MH-14, CK-5735 बसवण्याचा प्रयत्न केला. अपहरण करण्याचा प्रयत्न झालेल्या युवक हा बांधकाम व्यवसायिक आहे. झटापटीत एका अज्ञाताने गोळीबार केला. येथून अपहरण करुन युवकाला चितेगाव-आपतगाव येथे वाहनात बसवून नेले. या घटनेत युवकाच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. तेथे गाडीचे डिझेल संपल्याने अज्ञात आरोपी जखमी अवस्थेत सोडून गेले. अशी माहिती सुत्राकडून मिळाली आहे. जख्मी अवस्थेत घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जूने वादातून हि घटना घटल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. शहरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस आरोपिंचा शोध घेत आहे. युवकाचे नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली आहे. सातारा पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केला असता घटनेची अजून माहिती घेत आहे अजून तपास सुरु आहे आरोपिंना लवकरच अटक करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.