औरंगाबाद
खुलताबाद येथे दर्गा कमिटीच्या वतीने पोलिस प्रशासनाचा सत्कार

खुलताबाद / प्रतिनिधी
खुलताबाद येथील ज़र ज़री बक्ष उरुस व ईदे मिलादुन्नबीच्या निमित्ताने पोलिस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दंगा काबू पथक व यांनी दर्गा परिसरात चोख बंदोबस्त पार पाडल्यानी यांचा सत्कार दर्गा कमिटीच्या वतीने आज बुधवार रोजी सकाळी दहा वाजता त्यांना पुष्पहार घालून ‘खाजा मिठाई’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले.यावेळी दर्गा सय्यद जैनोद्दीन उर्फ़ बावीस ख़्वाजा दर्गा कमिटी चे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी ,व नगरसेवक ता दर्गा कमिटीचे माजी अध्यक्ष मुनीबोद्दीन, हबीबोद्दीन,शेख शकील,शेख रफीक, शेख आरिफ,समाज सेवक शेख जावेद यांच्यासह दर्गा कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शेअर करा