औरंगाबाद
वीरेंद्र कुमार वाघ यांची वंचित बहुजन आघाडीच्या तालुका महासचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहिर सत्कार

खुलताबाद / प्रतिनिधी
खुलताबाद येथील वीरेंद्र कुमार सीताराम वाघ यांची वंचित बहुजन आघाडीच्या तालुका महासचिव पदावर निवड करण्यात आली असुन ज्येष्ठ नेते दत्तू पाटिल फुलारे (सूलीभंजन) यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघ यांना हार घालून सत्कार करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने तसेच जिल्हा उपाध्यक्ष वसंता दादा शिरसाट गल्लेबोरगावकर यांच्या विशेष शिफारसाने ही निवड करण्यात आली.म्हणून वीरेंद्र कुमार वाघ यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी तरूण भारत चे ज्येष्ठ पत्रकार संतोष पाटिल करपे,MCN न्यूज़ चॅनेलचे पत्रकार मछिंद्रनाथ घोरपडे, न्यूज़ 7 महाराष्ट्रचे पत्रकार सलमान खान, कैलास फुलारे ,महिंद्रा घुसळे,प्रकाश औटे,नितिन जाधव आदि उपस्थित होते.
शेअर करा