रामू गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने शिक्षक समिती कडून सत्कार

औरंगाबाद / प्रतिनिधी
शिक्षक समिती औरंगाबाद जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते शिक्षक समितीमध्ये एक निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता रामू गायकवाड पाटील (राहणार वाघोळा तालुका फुलंब्री) मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव गांगदेव केंद्र धामणगाव तालुका फुलंब्री हे ३१ आँक्टोबरला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत.सुरुवातीपासून शिक्षक चळवळीत सक्रीय असलेले जगन्मित्र,एक सच्चा कार्यकर्ता,शिक्षक पतसंस्थेच्या वैभवशाली काळातील हुकमी शिलेदार, जुन्या नव्या शिक्षक कार्यकर्ते व नेते यांचा दोस्त, निगर्वी,कामाशी प्रामाणिक,मितभाषी,दिलदार असे रामू गायकवाड यांना औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास आज ८१ मुख्याध्यापकांनी सेवानिवृत्त निमित्ताने शुभेच्छा दिल्या हे त्याच प्रेमाचं प्रतीक आहे. एरवी शुभेच्छा हा उपचार मानणाऱ्या बोचरे सरांनी दोनदा शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड,नितीन नवले,शाम राजपूत,शालिकराम खिस्ते, गुलाब चव्हाण, विष्णु भंडारे, के.के.जंगले,रऊफ पठाण,चंदू लोखंडे,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी,औरंगाबाद तालुका अध्यक्ष भाऊसाहेब-बोर्डे, विलास चव्हाण, बबन चव्हाण, कैलास ढेपले,संजय शेळके,मंगला मदने,वर्षा देशमुख, वैशाली हिवर्डे, अर्जुन पिवळ,प्रकाश जायभाऐ, के.डी.मगर,दत्ता खाडे,पंकज सोनवणे,पंजाबराव देशमुख, आदिंनी शुभेच्छा दिल्या. यावेळी औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय साळकर,जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.