अमरावती
भातकुली तालुक्यात बोंडअळीचा शिरकाव,ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात

अमरावती/ सचिन ढोके
भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांसोबतच जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी २०२० हे वर्ष खूपच नुकसानकारक ठरत आहे. सुरुवातीपासून ते अद्याप पर्यंत कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यानंतर मूग, उडीद, सोयाबीन पीक हजारो शेतकऱ्यांच्या घरात आलेच नाही. काही शेतकर्यांच्या घरात आले ते खर्चालाही परवडले नाही. आणि आता तालुक्यातील बहुतांश गावात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भातकुली तालुक्यात बहुतांश गावातील शेतात बोंडअळी कमी जास्त प्रमाणात कपाशी पिकावर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून बोंडअळीचा प्रादुर्भाव कोणत्या किटकनाशक औषधीने फवारणी केल्यावर कमी होईल का? आता कपाशीवर फवारणीचा खर्च करावा का? याची चाचपणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.
शेअर करा