लोहपुरुष आणि लोहकन्या जगाला आदर्शवत – डॉ अनिल भंगाळे

फैजपुर/राजू तडवी
राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या औचित्याने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि नवभारताचे झुंझार व्यक्तिमत्त्व प्रथम महिला पंतप्रधान आयर्न लेडी स्व इंदिराजी गांधी यांचे व्यक्तिमत्त्व समाजातील प्रत्येक घटकाने अभ्यासले पाहिजे. त्यांच्या भरीव कामगिरीमुळे भारत जगाला आदर्शवत असून त्यांचे आचार, विचार आणि संस्कार अंगिकारने हीच त्या महापुरुषांना खरी आदरांजली असेल असे मत तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सण आणि उत्सव समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी महर्षी वाल्मीक यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर आणि स्वयंसेवकांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली. सद्यस्थितीत कोरोना संक्रमणाच्या प्राश्वभूमीवर सरकारच्या निर्देशाचे पुरेपूर पालन करून समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तर उपप्राचार्य डॉ. ए आय भंगाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. नितीन चौधरी , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा शेरसिग पाडवी , महिला कार्यक्रम अधिकारी डॉ सरला तडवी व इतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.