औरंगाबाद
एन.ए.नाईक यांची केंद्रीय मुख्याध्यापक पदी नियुक्ती

महालगाव/प्रतिनिधी
दि.२८ रोजी जि प औरंगाबाद यांनी राबविलेल्या समुपदेशन मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत एन.ए.नाईक यांना केंद्र प्राथमीक शाळा गाढेपिंपळगाव तालुका वैजापूर येथे केंद्रीय मुख्याध्यापक पदी नियुक्ती मिळाली असून त्यांचे याबद्दल जि. प.औरंगाबाद चे शिक्षण व आरोग्य सभापती मा अविनाश पा गलांडे, वैजापूर पंचायत समिती सभापती पती मनाजी पा. मिसाळ,गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, शिक्षक भारती चे जिल्हा सरचिटणीस मच्छिंद्र भराडे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिपक दादा पवार, माजी सरपंच मोहनराव गायकवाड,सरपंच नारायणराव गायकवाड शिक्षक संघाचे विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शेअर करा