2 हजाराची लाच घेतांना पोलिस हवालदाराला पकडले

महालगाव/प्रतिनिधी
वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशन हद्दीत चोरवाघलगाव शिवारात हँटेलमध्ये दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 2 हाजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडल्याची कारवाई विरगाव पोलीस ठाणे हद्दीत चोरवाघलगाव शिवारात हँटेलमध्ये करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हवालदार खंडु महादेव मोरे वय 49 वर्षे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध कायद्या अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विरगाव पोलीस ठाणे हद्दीत चोरवाघलगाव शिवारात हँटेलमध्ये दारूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी आरोपी यांनी तक्रारदार याच्याकडे 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप राजपूत, पोलीस नाईक विजय ब्राम्हदे, किशोर म्हस्के, केवल गुसिंगे, राजेंद्र सिनकार, देवसींग ठाकूर यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले.