औरंगाबाद

मतदार नोंदणी वाढविण्यावर भर देत निवडणुकांच्या कामाला सुरूवात करा-खासदार डॉ भागवत कराड

गंगापुर /प्रतिनिधी

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुक कोणत्याही वेळी घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार नोंदणी वाढविण्यावर भर देत निवडणुकांच्या कामाला सुरूवात करा, अशा सूचना दिनांक १ नोव्हेंबर रोजी गंगापुर शहरात झालेल्या भाजपचे खासदार डॉ भागवत कराड  यांनी कार्यकर्त्यांना केल्या. खासदार कराड यांनी रविवारी शहरातील भाजपच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत त्यांनी विविध गोष्टींवर चर्चा केली. पदाधिकाऱयांची मते जाणून घेतली. आगामी काळात पदवीधर मतदार संघातील निवडणुका आहेत. त्यासाठी अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा. बूथ रचना, मतदारांशी संपर्क वाढावा, पक्ष देईल त्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचे आहे. त्यासाठी तयारीला लागा, अशा सूचना भाजपाचे प्रदेश सदस्य किशोरजी धनायत यांनी केल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, तालुका अध्यक्ष शिवनाथ मालकर, नगरसेवक प्रदिप भैया पाटील, जि प सदस्य मधुकर वालतुरे, पंचायत समिती सदस्य दिपक बडे, अविनाश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अशोक मंत्री, शहर सरचिटणीस प्रशांत मुळे, मा सरपंच ज्ञानेश्वर सवई, राजेंद्र काकडे, बद्री राऊत, वैभव धनायत, तसेच महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष यांच्यासह भाजप मंडल, युवा मोर्चा आणि महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close