शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर प्राणघातक हल्ला

संगमनेर/अमोल भागवत
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते श्रीकांत तानाजी मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण परिसरात प्रवरा परिसरातील पंधरा-वीस तरुणांनी एकत्र येऊन प्राणघातक हल्ला केला आहे. याबाबत संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली, असून यामध्ये श्रीकांत मापारी यांनी म्हटले आहे की मी संगमनेरहून लोणी कडे जात असताना माझ्या मागावर असलेले व राजकीय द्वेष मनात ठेवून कायम मला धमक्या देणारे रहिमपूर येथील सचिन रघुनाथ शिंदे, रवींद्र आबाजी गाडे, सुशील रघुनाथ शिंदे व इतर दहा पंधरा जणांनी मला एकटे गाठून माझ्या वर प्राणघातक हल्ला केला आहे. यावेळी श्रीकांत मापारी यांना जबर मारहाण झाली असल्याने त्यांना तातडीने तांबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्रीकांत मापारी यांच्या डोक्याला व डोळ्याला इजा झाली असून हाताचे व पायाचे हाड फॅक्चर झाले आहे.याबाबत आरोपींवर 327, 143, 147 ,323, 405 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून याचा पुढील तपास पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर करत आहेत. श्रीकांत मापारी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याने संगमनेर व राहाता तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त व सामान्य नागरिकांमध्ये मोठी तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. श्रीकांत मापारी यांना संगमनेर येथील तांबे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.