ब्रेकिंग

ऑक्टूबरचा दिवाळीचा पगार १० नोव्हेंबर पर्यंत न झाल्यास जि.प.समोर शिक्षक समितीचे बोंब मारो आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी मु.का.अधिकारी यांना शिक्षक समिती कडून निवेदन सादर

औरंगाबाद /सलमान खान

औरंगाबाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन विनंती करूनही या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी संबंधाने प्रशासनस्तरावरून कोणत्या अनुकूल हालचाली होत नाही याबाबत पुढाकार घेऊन प्रशासनाचा संबंधित विभाग चर्चा करण्याबाबतीतही प्रंचंड  उदासीन आहेत.शिक्षकांना सेवा करताना येणाऱ्या मूलभूत अडचणी आणि त्यांची सेवा विषयक प्रश्न..शिक्षक हा एक नागरिक समजून घेणे आणि त्या प्रश्नांच्या संबंधात काय कारवाई करता येईल याबाबत चर्चा करण्यास संबंधित विभागाचे होणारे दुर्लक्ष अस्वस्थ करणारा आहे याबाबत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व आँक्टोबरचे दिवाळी चे वेतन  १० नोव्हेंबर पर्यंत पगार न झाल्यास ११ नोव्हेंबरला  प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा परिषेसमोर बोंब मारो आंदोलन करणार असे निवेदन आज शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारीसह शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. शिक्षक समितीच्या वतीने आज  औरंगाबाद जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. गेल्या वर्षे भरापासून प्राथमिक शिक्षकांचे पगार जाणून बुजून व हेतूपुरस्कर , नेहमीच उशिराने केले जात आहेत.इतर विभागाचे वेतन लवकर केले जाते परंतु प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाला मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येते.अनेकदा मागणी करून देखील सीएमपी प्रणाली कार्यान्वित करावी या शिक्षक समितीच्या मागणीकडे  दुर्लक्ष केले जात आहे. पगाराबाबत वित्त विभाग हा नेहमीच शिक्षण विभागाकडे बोट दाखवतो..शिक्षण विभाग वित्त विभागाकडे बोट दाखवतो. प्रशासनात मेळ राहिलेला दिसत नाही. प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मेडिकल बिलाचे प्रश्न ही ब-याच दिवसापासून रखडलेला आहे.तो ही मार्गी लावावा,शालेय पोषण आहार स्वयंपाक व मदतनीस भत्ता दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावा.शासनाचे कोणताही अधिक्रुत आदेश नसताना.जिल्ह्यातील बरेच  गटशिक्षणाधिकारी आपापल्या सोयीने पत्र काढून शिक्षकांना कोरोना काळात शाळेत ५० % कर्मचारी उपस्थित राहाण्याचे आदेश काढत आहेत. शाळा सुरू करण्यापुर्वी.सर्व शाळा सँनेटाईज करून द्याव्यात. सर्वच विद्यार्थ्यांना मोफत मास्क उपलब्ध करून द्यावेत.सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा मोफत विमा उतरवण्यात यावा.यावेळी जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सतीश कोळी, किसन जंगले, कडूबा साळवे, कैलास ढेपले, केडी मगर, दत्ता खाडे, अर्जुन पिवळ, पंकज सोनवणे, प्रकाश जायभाई, लिंबा साळुंके देशमुख,विलास चव्हाण सह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close